Ad will apear here
Next
जनसेवा बँकेच्या डेक्कन शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर
जनसेवा बँकेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी बँकेचे संचालक संदीप सारडा, प्रविण तरडे, प्रदीप जगताप, रवींद्र वंजारवाडकर, माधुरी सहस्रबुध्दे

पुणे : जनसेवा सहकारी बँकेच्या शिवाजीनगर-डेक्कन शाखेचे स्थलांतर एरंडवणे येथील स्वमालकीच्या जागेत झाले. सोमवारी (१४ ऑक्टोबर) या नूतन वास्तूचे उद्घाटन लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे महानगरचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र हिरेमठ, माधुरी सहस्रबुध्दे, संचालक, बँकेचे सभासद, खातेदार व हितचिंतक उपस्थित होते.  

‘जनसेवा बँक ही खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारी बँक आहे,’ असे गौरवोद्गार  प्रवीण तरडे यांनी काढले.

‘सहकार क्षेत्र, आर्थिक क्षेत्र बदलत असून, या बदलानुरुप जनसेवा बँकही आपल्या कार्यप्रणालीत बदल करत आहे. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देऊन समाजाभिमुख काम करीत आहे,’ असे मत वंजारवाडकर यांनी व्यक्त केले.
  
‘या नूतन वास्तुमध्ये लॉकर्स व ए. टी. एम सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मोबाइल बँकिंगसारख्या अत्याधुनिक सेवा बँक देत असून, व्यावसायिक पातळीवरही उत्तम कामगिरी करत आहे,’ असे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZWQCF
Similar Posts
‘दीर्घ काळातील मोठ्या लाभासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर’ पुणे : ‘भविष्यात सोन्यातील गुंतवणुकीवर आजच्याइतके फायदे मिळणे शक्य नाही; मात्र शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील फायदा वाढवणे शक्य आहे. जोखीम घेऊनदेखील फायदेशीर गुंतवणूक करणे म्युच्युअल फंडाद्वारे शक्य आहे. ३० वर्षांत आपण केलेल्या गुंतवणुकीच्या चार ते ४० पट वाढ होण्याची क्षमता म्युच्युअल फंडातील
जनसेवा पुरस्कार नाना पालकर स्मृती समिती संस्थेस जाहीर पुणे : गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांना अत्यल्प दरात उच्चतम वैद्यकीय मदत करणाऱ्या नाना पालकर स्मृती समिती संस्थेस यंदाचा जनसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. जनसेवा सहकारी बँकेच्या वतीने दर वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे : पुणे शहराला समर्पित असलेल्या पुण्यभूषण या अभिनव दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच वाडेश्वर कट्ट्यावर झाले. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, अभिनेते प्रवीण तरडे आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान-पान सेवा करणारे वाडेश्वरचे ज्येष्ठ कामगार तुकाराम कुमकर यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले
‘पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तत्‍काळ पंचनामे करावेत’ पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून, मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. शहरी भागामध्येही घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करण्याचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language